सांगोला ग्रामीण भागात गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टर यंत्राचा आधार.
पूर्ण जगात सांगोला तालुक्याला डाळिंबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते परंतु 'मर' या रोगामुळे सांगोला तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर डाळिंब फळ बागा नष्ट झालेल्या आहेत .त्यामुळे या भागातील शेतकरी आता दुसरी पिके घेण्यात व्यस्त आहे .सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टेंभू म्हैसाळ योजनेची कामे पूर्ण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र ओलिताखाली खाली आलेले आहे . या भागातील शेतकरी आता हंगामानुसार पिके घेत आहे आता रब्बीचा हंगाम असल्याने
मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात हरभरा ,मका गव्हाचे पीक घेतले जात आहे. आता मोठ्या प्रमाणावर गव्हाची काढणी चालू असल्याने गव्हाचे पिक काढण्यासाठी शेतकरी वर्गातून हार्वेस्टर यंत्राला पसंती दिली जात आहे . ग्रामीण भागामध्ये काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर मजुरांच्या तुटवडा जाणवतो तसेच महिला मजुरांना तिनशे व पुरुष मजुरांना पाचशे रुपये मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकरी वर्गातून हार्वेस्टर यंत्राला पसंती दिली जात आहे या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होते तसेच याचा एकरी तीन हजार रुपये दर असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते त्यामुळे ग्रामीण भागातून हार्वेस्टर यंत्रणाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पसंत दिली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा