शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) गरजेचे.. - उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड
*शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) गरजेचे.. - उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड*
सांगोला प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने (फार्मर आयडी) म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढणे सध्या गरजेचे आहे व यासाठी मी ही काढीत आहे व आपणही काढून घ्या. सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली नाझरे विद्या मंदिर मध्ये कॅम्प लावून मोफत ओळखपत्र देऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर केली हे कौतुकास्पद बाब आहे व याबद्दल सर्व टीम व शेतकरी यांचे आपण अभिनंदन करतो असे मत मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी कॅम्प ला भेट देऊन मत व्यक्त केले.
सुरुवातीस सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या शुभहस्ते उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या शुभ असते शेतकरी आयडी फॉर्म प्रतीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली व रविराज शेटे यांच्या मागणी व सूचनेनुसार ओळखपत्र कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याचे मंडल अधिकारी हरीश जाधव यांनी सांगितले. तसेच फार्मर आयडी साठी पैसे लागत नाही, शेतकऱ्यांनी आपला आयडी लवकर काढावा व यासाठी लवकरच घरोघरी फिरून ओळखपत्र तयार करण्याचे सूचना देण्यात येणार आहेत असे तलाठी किरण बाडीवाले सांगितले.
सदर प्रसंगी सरपंच संजय सरगर, ग्राम. सदस्य शशिकांत पाटील, लहुजी सेनेचे संस्थापक नितीन रणदिवे, सचिव अभिषेक कांबळे, महेश वाघमारे, प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, शेतकरी मुकुंद पाटील, बाळासो पाटील, कोंडीबा जावीर, शिक्षक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सीएससी सेंटरचे नितीन टिंगरे, बालाजी पालसांडे, समाधान आदाटे, ओंकार यादव, उत्तम साठे, अंकुश आदाटे, विकास आदाटे, देविदास लोखंडे, निरंजन केंगार, शरद कोळवले, खांडेकर, आनंद सोनवणे इ. चा सत्कार करण्यात आला. शेवटी तलाठी किरण बाडीवाले यांनी आभार मानले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)



No comments