आपला मृत्यू एवढा फुकट झाला आहे का?: सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर.
(अनकढाळ टोल नाका येथे रक्तदान शिबिरामध्ये केले वक्तव्य)
वाटंबरे /प्रतिनिधी:
आपल्या या राष्ट्रीय महामार्ग वरती जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेगळे मार्ग आहेत परंतु काही लोक जाणुन बुजुन जाण्याच्या व येण्याच्या मार्गाने विरोध दिशेने प्रवास करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे आताच्या ताज्या सर्वेनुसार अर्धा ते पाऊण तास या वेळेमध्ये सरासरी दहा लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो , आपला मृत्यू एवढा फुकट झाला आहे का असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर यांनी शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी अनकढाळ टोल नाका येथे रक्तदान शिबिरामध्ये उपस्थितीना मार्गदर्शन करताना केले .
पुढे म्हणाले सर्व नागरिकांनी गाडी चालवताना दारू पिऊ नये, दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर करावा, सीटबेल्टचा वापर करावा तसेच रस्ता वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे यावेळी त्यांनी आव्हान केले.
रस्ता सुरक्षा सप्ताह व पुढारी पेपर वर्धापनदिनाचे औचीत्य साधत महामार्ग पोलीस सुरक्षा पथक, क्यूब हायवे व पुढारी पेपर , पंढरपूर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पत्रकार दत्तात्रय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यक्रम राबविले पाहिजेत रक्तदान, वृक्ष लागवड , आरोग्य शिबिर यासारखे उपक्रम राबवावे तसेच वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे असे यावेळी त्यांनी म्हटले.
या रक्तदान शिबिरास वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार, माजी अभियंता सिताराम बंडगर ,ग्रामपंचायत सदस्य नामदेव बंडगर, माजी सरपंच पिंटू बंडगर, माजी सरपंच उत्तम पाटील , उद्योजक सुभाष पवार ,ग्रामपंचायत सदस्य विजय बंडगर , यशराज गांडूळ खत प्रकल्प उद्योजक सुरेश पवार , सोसायटी सचिव दत्तात्रय बंडगर ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष भारत पवार, उद्योगपती वामन बंडगर, प्रगतशील बागायतदार बाळासाहेब बंडगर, प्रगतशील बागायतदार शिवाजी बंडगर, फारुक मुलांनी ,इम्रान मुलानी,
क्यूब हायवेचे आकाश लेंडवे (मेंटनेस मॅनेजर ) प्रमोद कोटकर, विष्णूदत्त शर्मा , धीरज पाटील, पंढरपूर ब्लड बँकेच्या लक्ष्मी जगधने (जनसंपर्क अधिकारी ,) संतोष उपाध्ये, ओंकार नागटिळक, चेतन पाटील ,शुभम घोंग, भावना घोंग व टोल नाका व क्यूब हायवेचे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी यावेळी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार दत्तात्रय पवार यांनी केले व आभार प्रदर्शन माजी सरपंच पिंटू बंडगर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा