नाझरे प्रतिनिधी :
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संच लित नाझरा विद्या मंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली असून, परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे केंद्र संचालक बी. एस. माने, उपकेंद्र संचालक टी. एस. बंडगर, पर्यवेक्षक एम. डी. धायगुडे, दक्षता कमिटी सदस्य रविराज शेटे, बलवडी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आर. डी. कोडग, पोलीस प्रतिनिधी एस. जे. बंडगर, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, आरोग्य सेविका अंजली चंदनशिवे, शिक्षक, शिक्षकेतर प्रतिनिधींच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सुरुवातीस गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच आत्मविश्वास बाळगून कोणताही तणाव न घेता उज्वल भविष्यासाठी उत्तम यश संपादन करा असे केंद्र संचालक बी. एस. माने यांनी यावेळी सांगितले. तसेच ना झरा विद्या मंदिर, श्रीधर कन्या प्रशाला नाझरे, बलवडी कन्या प्रशाला, बलवडी हायस्कूल बलवडी, गुरुकुल विद्यापीठ राजुरी इत्यादी प्रशालेतील 327 परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेत बसले असल्याचे उपकेंद्र संचालक टी. एस. बंडगर यांनी यावेळी सांगितले. दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च अखेर दहावीची परीक्षा असून, सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व परीक्षेच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा