*पंचायत समिती सांगोला बचत भवन येथे मंजूर आदेश व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न. मा.आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आ. दिपकआबा पाटील व बीडीओ उमेशचंद्र कुलकर्णी*
पंचायत समिती सांगोला बचत भवन या ठिकाणी आज प्रौढदृश्य प्रणाली द्वारे राज्यस्तरीय कार्यक्रम 4: 45 वाजता श्री शिवछत्रपती संकुलन बालेवाडी पुणे येथून सुरू झाला आहे यामध्ये पहिला हप्ता वितरण पुणे येथून मा. नामदार अमित शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ. राजाराम दिघे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिल्हा तालुका व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर घरकुल लाभार्थींना मंजुरीचे पत्र वितरण कार्यक्रम झाला आहे
व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या गृहोत्सावाच्या कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतचे सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजी-माजी पदाधिकारी, पालक अधिकारी, पंचायत अधिकारी ,संपर्क अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मंजूर आदेश व पहिला हप्ता वितरण करण्यात आला आहे
पंचायत समिती बचत भवन या ठिकाणी दहा ग्राम पंचायत मधून 300 लाभार्थी उपस्थित असून यामध्ये महिला वर्ग जास्त संख्येने उपस्थित होता आमदार मा.डॉ बाबासाहेब देशमुख मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थींना मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी जागेचा प्रश्न , घरकुल अनुदान वाढवणे, इत्यादी बाबत लाभार्थींशी चर्च्या केली आहे तसेच गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी पंचायत समिती सांगोला यांच्या सहीचे आदेश वाटप करण्यात आले असून सांगोला तालुक्यातील 76 ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला या कामी उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, विस्ताराधिकारी अमोल तोडकरी, देवराज पुकळे, मिलिंद सावंत पुंडलिक गंगदे , अभिजीत पवार , घरकुल त विभागातील भारत हत्तेकर , आर एचसी सुतार , कांबळे ,चंदनशिवे,बुणगे, कमलेश सातपुते, प्रीतम गोंगाने, खाडे, आनंद जाधव इत्यादी अधिकाऱ्यांनी काम पाहिले आहे


.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा