रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अनकढाळ टोल नाका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका अनकढाळ टोल नाका येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महामार्ग पोलीस सुरक्षा पथक ,क्यूब हायवे बोरगाव वाटंबरे हायवे प्रायव्हेट लिमिटेड , पुढारी पेपर वर्धापन दिन, ब्लड बँक पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरास प्रज्ञा देशमुख (पोलीस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक सोलापूर )मनोज बाबर (सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस उपकेंद्र सांगोला )संजय पाठक (निवासी संपादक दैनिक पुढारी सोलापूर) सत्यनारायण गुर्जर (प्रोजेक्ट हेड )या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित या शिबिराचे उद्घाटन सोहळा होणार आहे .
तसेच या शिबिरास अनकढाळ गावच्या सरपंच सौ.वैशाली बंडगर, उपसरपंच सौ.मयुरी आदाटे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव बंडगर , मा. ग्रामपंचायत सदस्य आधिक बंडगर ,राजे शिवाजी अकॅडमी चे संस्थापक पांडुरंग कोकरे ,माजी सरपंच उत्तम पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दगडू बंडगर, सोसायटी सचिव दत्तात्रय बंडगर, सोसायटी सचिव बंडू बंडगर, पत्रकार दत्तात्रय पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या रक्तदान शिबिरास अनकढाळ तसेच आजूबाजूच्या गावातील , तसेच वाहनधारकांनी रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविण्याचे आव्हान आयोजकाकडून करण्यात आले आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अनकढाळ टोल नाका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा