Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

वाटंबरे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

p> वाटंबरे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.





महाराष्ट्राचे दैवत  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वाटंबरे (सांगोला ) येथे  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मारुती मंदिरासमोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वाटंबरे गावचे प्रथम नागरिक सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित असणाऱ्या तरुणांनी तसेच गावातील ईतर नागरीकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव च्या घोषणा दील्या .



प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेशभूषा परिधान करून पथनाट्यद्वारे शिवकालीन जिवंत देखावे सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली तसेच यावेळी

प्रशालेतील मुलींनी  लेझीम नृत्य सादर केले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या मनोगतच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला  . 

कार्यक्रमाची शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रशालेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विद्यार्थी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळातील सर्व सदस्य व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते . सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या उत्सवात मिरवणूक संपन्न झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart