Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

अजनाळे चे आरोग्य सेवक श्री अशोक कलाल यांना सीबीएस न्यूज मराठी यांचा राज्यस्तरीय पुरस्कार.


 *अजनाळे चे आरोग्य सेवक श्री अशोक कलाल यांना सीबीएस न्यूज मराठी यांचा राज्यस्तरीय पुरस्कार.        


            प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे अंतर्गत उपकेंद्र अजनाळे येथील आरोग्य सेवक श्री अशोक विठ्ठल कलाल यांना सी बी एस न्यूज मराठी यांचा सहावा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 मधील आदर्श सेवा रत्न पुरस्कार देऊन ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सांगोला चे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व सांगोल्याचे माजी आमदार दीपक (आबा )साळुंखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रसिद्ध कथाकथनकार श्री आप्पासाहेब खोत, हिंदी मराठी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते महादेव शिरोळकर, होम मिनिस्टर फेम श्री संदीप कुडचीकर, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख, ज्येष्ठ संपादक सतीश (भाऊ) सावंत, मोहन मस्के सर, सी बी एस न्यूज चे मुख्य संपादक चांद भैया शेख, उपसंपादक राजाभाऊ गुजले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.    श्री अशोक कलाल यांचे शिक्षण बी. एससी.बी.पी. एड झाले असून त्यांनी मौजे चिनके येथे माध्यमिक हायस्कूल येथे सहा वर्ष सहशिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. श्री अशोक कलाल हे सदा हसतमुख व प्रसन्न, सर्वांना सहकार्य करण्याची त्यांची नेहमी भावना असते.                               मौजे अजनाळे येथे सण 2019- 20 मध्ये त्यांनी कोविड मध्ये उत्कृष्ट काम करून गावांमध्ये   एक ही रुग्ण covid नी मृत्यू झाला नाही. तसेच कोविड पॉझिटिव्ह चे प्रमाण ही अत्यंत कमी होते. म्हणून शासन दरबारी दखल घेऊन त्यांना जिल्हा परिषद सोलापूर- पंचायत समिती सांगोला यांनी उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी म्हणून ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन तत्कालीन आमदार श्री शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते.तसेच त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये अबोली फाउंडेशन बार्शी तर्फे आदर्श समाजभूषण पुरस्कार, सांगोला नगरीतर्फे आदर्श आरोग्य कर्मचारी पुरस्कार, तुफान क्रांती तर्फे आदर्श सेवा सन्मान पुरस्कार, महारोग्य शिबिर पंढरपूर आषाढी यात्रा येथे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदर्श सेवा रत्न पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे . सीबीएस न्यूज मराठी यांचा राज्यस्तरीय आदर्श सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे पंचायत समिती सांगोला चे गटविकास अधिकारी श्री उमेशचंद्रजी कुलकर्णी,   तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर. अविनाशजी खांडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर. अजित धायगुडे, डॉक्टर अमोल  येलपले आरोग्य सहाय्यक श्री अंकुश वाळके, आरोग्य सहायिका श्रीमती भारती भोसले,ग्रामपंचायत अजनाळ्याचे सरपंच सौ. अनिता चंद्रकांत पवार यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments