Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी श्री.प्रशांत शिंपले यांची निवड

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी श्री.प्रशांत शिंपले यांची निवड
दि.०१/०२/२०२५ रोजी हडपसर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पदाधिकारी वाटप कार्यक्रम सोहळा पार पडला. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.गणेश महाडिक यांच्या हस्ते तसेच पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख श्री.कांताभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रशांत शिंपले, हवेली तालुका अध्यक्ष श्री.सतीशकुमार मधुकर कोकरे ,हवेली तालुका उपाध्यक्ष श्री.अमित मारुती मोरे दौंड तालुका उपाध्यक्ष श्री.अविनाश लोंढे सदस्य पदी श्री.लक्ष्मण खैराटे निवड करण्यात आली.
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.युवा ग्रामीण पत्रकार संघ वाढीसाठी व पत्रकारांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता यावे त्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ सदैव तत्पर आहे. लोकांच्या समस्या, तक्रारी मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत राहिल. 
 युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या व झेप फाउंडेशनच्या वतीने निवड झालेल्या पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले

No comments