विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नवादी रहावे : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद पवार.
विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नवादी रहावे : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद पवार.
वाटंबरे /प्रतिनिधी:
माझे पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे याच प्रशालेतुन झाले असून मी पोलीस क्षेत्रात येण्याअगोदर मला कलाक्षेत्राची आवड होती ती आवड जोपासण्यासाठी एटीडी सारख्या व्यावसायिक शिक्षणाची निवड, अर्थार्जनासाठी ग्लास पेंटिंग करणे ,चित्रकला व रांगोळीची आवड जोपासणे ,मित्रांच्या साह्याने ॲनिमेशन क्षेत्रात नोकरी करत असताना राज्य राखीव पोलीस दलात भरती झालो. पदोन्नतीनुसार हवालदार पदावर नियुक्ती झाली आणि २०२५ मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने वाटंबरे ग्रामपंचायत व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेच्या संयुक्त विद्यमानाने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलत होते यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितला तसेच ते विद्यार्थ्यांना म्हणाले ध्येयाने झपाटलेल्या व्यक्ती जर आपण कोठून आलो ,यापेक्षा आपण कोठे जाणार आहोत याचे भान ठेवून मार्गक्रमण करत राहिला तर नक्कीच यशस्वी होतो .विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नवादी राहण्याचा मौलिक सल्ला त्यांनी आपल्या मनोगतातून दिला .
सांगोला तालुका वाटंबरे येथे मंगळवार दि 4 फेब्रुवारी रोजी
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे या प्रशालेचा विद्यार्थी शरद पवार यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने वाटंबरे ग्रामपंचायत व प्रशालेच्या संयुक्त विद्यमानाने सत्कार सोहळा आयोजित केला गेला होता.
या सत्कार समारंभ प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निता पवार व ग्रामपंचायत सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रशालेच्या मुख्यध्यापीका नीता पवार या आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करू शकतो . यावेळी प्रशालेणे विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या म्युझिक सिस्टीमचा उद्घाटन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद पवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी गावातील सर्व मान्यवरांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद पवार यांचा सत्कार करत त्याचे अभिनंदन केले.
या सत्कार समारंभासाठी वाटंबरे ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायसदस्य ,विविध संस्थांचे पदाधिकारी गावातील विविध मान्यवर तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडागळे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन पर्यवेक्षक शिवशरण सर यांनी केले.

No comments