वाटंबरे येथील सुरेश पवार हे राज्यस्तरीय उद्योजक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित
वाटंबरे येथील सुरेश पवार हे राज्यस्तरीय उद्योजक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित.
श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने सामाजिक ,राजकीय, सांस्कृतिक ,सहकार, साहित्यिक, शैक्षणिक, उद्योग, कला ,महिला सबलीकरण, देशसेवा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी जिवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वकर्तत्वाने शून्यातून वाटंबरे सारख्या ग्रामीण भागामध्ये यशराज गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय खताची निर्मिती करणारे विविध कृषी पुरस्काराने सन्मानित असणारे सुरेश पवार यांना उद्योगरत्न जिवन गौरव हा पुरस्कार मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचे आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवर ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सचिव, प्रशालेचे प्राचार्य तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


No comments