Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

सांगोला महाविद्यालयामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी.

सांगोला महाविद्यालयामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी.


सांगोला/ प्रतिनिधी:

            सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे, सांगोला महाविद्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त, त्यांच्या प्रतिमेस दि.14 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अर्जुन मासाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पंडीत नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. देशाच्या उभारणीत त्यांनी महत्वाचे कार्य केले. तसेच त्यांचे अभ्यासू व मनमिळावू व्यक्तीमत्व होते असे मत त्यांनी व्यक्त केले. नेहरू यांना लहान मुले आवडत असत म्हणून त्यांची जयंती बालदिन म्हणून देखील साजरी केली जाते. असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमासाठी आय.क्यु.ए.सी. को-ऑर्डीनेटर डॉ. राम पवार यांचे मार्गदर्श्‍न लाभले.     

            कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. ए. एम. पवार व श्री. अमर केदार यांनी केले. यावेळी प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart