पुणे जिल्हा गृहरक्षक कार्यालय मध्ये कार्यरत असलेले विभाग नाईक पदावर कार्यरत असलेले गृहरक्षक जवान यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्ध कलेपासून प्रेरित होऊन केला नवीन जागतिक स्तरावरील वर्ल्ड जेवेलिंग आर्चरी या खेळाचा अविष्कार .या गृहरक्षक दलाच्या जवानाचे नाव उमेश लोंढे असून सध्या ते गृहरक्षक दलात विभाग नाईक पदावर कार्यरत असून त्याचप्रमाणे मार्शल आर्ट खेळामध्ये ब्लॅकबेरी पदवी धारक आहेत व्यवसायाने शिक्षक असल्याने गेली अनेक दिवस त्यांचा या खेळावर संशोधन प्रबंध चालू आहे हा खेळ श्री शिवछत्रपती यांच्या स्वराज्यातच तयार झाला असल्याचा अभिमान आहे. आत्तापर्यंत या खेळात सहभागी झालेले देश पुढील प्रमाणे केनिया, लावस ,श्रीलंका, पाकिस्तान, इराण व कांगो त्याचप्रमाणे महाराष्ट्रा त हा खेळ ७ जिल्ह्यात खेळला जात आहे.
अत्यंत कमी खर्चात तसेच कमी साहित्यात खेळला जाणारा हा खेळ असून यासाठी कमीत कमी साधनसामग्रीच्या यामध्ये समावेश आहे आधुनिक स्तरावर याला वर्ल्ड जैविन
आर्चरी या संघटनेचे नाव देऊन स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शहरी, ग्रामीण उत्कृष्ट कला, क्रीडा खेळाडूंना आपली प्रतिमा दाखवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .याने जुन्या आणि नवीन अशा दोन्ही खेळाचा समावेश करून याला अचूकता व भेदकता या दोन मुख्य कौशल्यावर आधारित याची रचना करण्यात आली आहे.
परिचय: उमेश रमेश लोंढे- शिक्षण एम ए, बी पि एड , सी पि एड ,डी,वायर,एड
पुरस्कार -क्रीडा रत्न 2016 पिंपरी चिंचवड ,आदर्श क्रिडा शिक्षक 2018 सातारा,
आंतरराष्ट्रीय कांस्यपदक (कराटे )एशियन खेळाडू 2013 (किंक्) बॉक्सिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग 12 वेळा, खेळ पदवी- ब्लॅक बेल्ट 4th दान ,योगशिक्षक नाशिक विद्यापीठ स्काऊट गाईड शिक्षक, क्रीडा व शारीरिक शिक्षण अनुभव- एकूण १६, वर्ष माजी मुख्याध्यापक माईड सक्सेस इंटरनॅशनल स्कूल चाकण पुणे, संचालक- ग्रेट व्हिजन इंग्लिश स्कूल निगडी ,माजी क्रीडा शिक्षक डी वाय पाटील स्कूल बड्स इंटरनॅशनल, विभाग नाईक स.क्र 5220 पुणे शहर पुणे गृह विभाग

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा