Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना भांडी वाटप व विविध मान्यवरांचे सत्कार.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना भांडी वाटप व विविध मान्यवरांचे सत्कार.


वाटंबरे /प्रतिनिधी: सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे वाटंबरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने सोमवार दि.२ सप्टेंबर रोजी भिमनगर येथील बौद्ध विहारात बांधकाम कामगारांचे किट व विकास सेवा सोसायटीचे नुतन चेअरमन , व्हा चेअरमन व नुतन तंटामुक्ती अध्यक्षांचे सत्कार करण्यात आले.
समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन तंटामुक्त अध्यक्ष पदाच्या माध्यमातून दिन ,दलित, वंचित गोरगरिबांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार तसेच गावातील भांडण हे गावातच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे नूतन तंटामुक्ती अध्यक्ष विजय पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. 
यावेळी नूतन सोसायटी चेअरमन खंडू पवार यांनी ही जास्तीत जास्त सोसायटी सभासद वाढवत जे थकीत कर्जदार आहेत त्या सभासदाकडुन कर्ज वसुली करत सर्वांना कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 
यावेळी दिनेश धनवडे यांनी ६३ बांधकाम कामगाराची नोंदणी करत ३३ बांधकाम कामगारांना भांड्याचे कीट मिळवून दिल्या बद्दल त्यांचा ही सत्कार यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष रोहीत चंदनशिवे यांच्या हस्ते नुतन तंटामुक्त अध्यक्ष विजय पवार यांचा सत्कार करण्यात आला नुतन सोसायटी चेअरमन खंडू पवार यांचा सत्कार दिनेश धनवडे यांच्या हस्ते करण्यात आला, व्हा चेअरमन विठ्ठल पवार यांचा सत्कार आप्पासाहेब गेजगे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी ग्रामपंचायत सदस्य सुब्राव बापू पवार व भाग्यवान पवार , आप्पासाहेब गेजगे यांचा ही सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळासाहेब धनवडे यांनी केले.
या सत्कार समारंभ प्रसंगी मोठ्या प्रमाणात वाटंबरे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart