Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

संस्कृती, अध्यात्म, रुढी व परंपरा जपणार आदर्श गाव पापर्डे बु.

संस्कृती, अध्यात्म, रुढी व परंपरा जपणार आदर्श गाव पापर्डे बु.
पुणे/प्रतिनिधी:
  एक गाव एक गणपती या संकल्पने बरोबरच पापर्डे बुद्रुक ता. पाटण या गावाने सर्वांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या गावामध्ये अनेक वर्षाची परंपरा आहे ती म्हणजे गावामध्ये एकाच ठिकाणी श्री. गणेशाची स्थापना करण्यात येते. नवचैतन्य गणेश तरुण मंडळ पापर्डे बुद्रुक असे गावात एकमेव मंडळ आहे व याच ठिकाणी सर्व अबाल -वृद्ध, महिला- पुरुष भक्तीभावाने कोणताही भेदभाव न करता सहभागी होतात.
 पापर्डे बुद्रुक मधील बहुतांश लोक पुणे, मुबंई येथे वास्तव्यास असतात. माञ श्री गणेशाच्या स्थापनेसाठी सर्वच लोक आपल्या गावी अगदी न चुकता येतात त्यामुळे धार्मिक, सामाजिक व एकतेचा नवीन आदर्श असा गाव पहायला मिळतो. पापर्डे बुद्रुक हे गाव श्री. गणेशाच्या आगमनादिवशी पायी दिंडी सोहळा आयोजित करत असते. या वर्षी या मंडळाने अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबविण्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये श्री. गणेशाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी ग्राम स्वच्छता अभियान आयोजित केले आहे. स्वच्छ गाव सुंदर गाव असा संदेश या वेळी देण्यात येणार आहे. तदनंतर श्री. गणेशांच्या आगमनासाठी सर्व स्ञिया एकाच रंगाची साठी व युवक- पुरुष वारकरी पेहराव करतात. श्री. गणेशाला आणण्यासाठी पायी दिंडीचे आयोजन केले आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व जातीधर्माचे लोक एकञ येऊन पापर्डे बुद्रुकच्या राजाला आणण्यासाठी उत्साहाने सहभागी होतात. शासकीय नियमांनुसार व पर्यावरणाच्या रक्षणासाठी डीजे ध्वनीप्रदुषण न करता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अभंग, गवळणी गात गव्हाणवाडी ते पापर्डे असा सुमारे 4-5 कि.मी. प्रवास पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो. वाचे बोलावी ज्ञानेश्वरी !! डोळा पाहावी पंढरी !! या उक्ती प्रमाणे साक्षात पंढरी अवतरल्याचा भास आपल्याला पहायला मिळतो. 
 सदर उत्सावावेळी शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी यांना प्रोत्साहन देणेसाठी बक्षीस वितरण तसेच मैदानी खेळ आयोजित केले आहेत. ग्रामस्थ महिला वर्ग यांचेसाठी मनोरंजनातून समाजप्रबोधन, लहान मुले ते युवक- युवती यांचेसाठी स्वंयरक्षणासाठी कराटे ट्रेनिंग, चर्चासञ, आरोग्य तपासणी शिबीर, महिलांसाठी गौरी पुजन खेळ व होम मिनिस्टर, जोडी तुझी माझी, विविध मैदानी, बौद्धिक स्पर्धा, वृक्षारोपण , पारंपारिक गोंधळ असे अनेक उपक्रम या वर्षी पापर्डे बुद्रुक येथे आयोजित केले आहेत.
 असा दुर्मिळ पण आदर्श घेण्यासारखा सोहळा पाहण्यासाठी शेजारील गावातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात. पापर्डे बुद्रुक येथील एक गाव एक गणपती या उपक्रमाची पाटण, कराड तालुकाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरही नोंद घेण्यात येत असते. या अश्या आदर्श गावातील गणेशोत्सवाची दखल शासन स्तरावर घेण्यात यावी अशी येथील ग्रामस्थांची विनंती आहे.
 तसेच नवचैतन्य गणेश तरुण मंडळ पापर्डे बुद्रुक चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार / सचिव, सभासद व ग्रामस्थ यांचेकडून सदर सामाजिक दिंडी सोहळ्यास व उत्सवाच्या उपक्रमांत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart