नाझरे प्रतिनिधी
गुरु परते दैवत |
नाही नाही ओ नि भ्रांत|
या लागी पूजन भजन एकांत
त्यासी की जे ||
या जगात गुरुशिवाय दुसरे दैवत नाही, आणि म्हणून भजन, पूजन, सेवा गुरु बरोबरच करावा हाच उद्देश ठेवून नाझरे ता. सांगोला येथे श्रावण मासानिमित्त शिव दिंडी सोहळ्याची सांगता डॉक्टर धारेश्वर महास्वामीच्या हस्ते महादेव मंदिर येथे करण्यात आली. यावेळी पायी हळूहळू चाला, मुखाने शंभू महादेव बोला, धारेश्वर बोला, माऊली, माऊली गुरुराज माऊली, लई आगळा जगावेगळा धारेश्वर महास्वामींचा लागला लळा, धावत आलो स्वामी तुमच्या पाया, वेडा झालो, वेडा झालो, वेडी याच्या गावा गेलो या भजनाने शिवभक्तांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
जीवनात खरा आनंद मिळवायचा असेल तर सात्विक विचार जोपासून सकाळी पहाटे लवकर उठा व यासाठी महिलांनी तरी लवकर उठावे म्हणजे संतती व समृद्धी मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्रिलोकात नारदाने विना घेऊन भ्रमंती करून चिंतन केले याप्रमाणे आपणास ही प्रत्येकाला शिवाकडे जायचे आहे मग ते अंथरुणावर पडून नाही तर बालपणापासून नाचू कीर्तनाचे रंगी याप्रमाणे भजन करून शिवमय वातावरण तयार करा म्हणजे शंभू महादेव व पार्वती परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद मिळेल व पुण्याईचे काम होईल असे प्रवचनात धारेश्वर महास्वामींनी सांगितले. यावेळी महास्वामींचा सत्कार लक्ष्मण काका पाटील व शिवया स्वामी सर यांच्या हस्ते व रविराज स्वामी, मुकुंद पाटील, राजू रायचुरे, शरद स्वामी, जयपाल गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी महास्वामींची महाआरती जयपाल गुरव व सौ उज्वला गुरु व यांच्या हस्ते करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी असंख्य महिला, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा