Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

सांगोला महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने “जागतिक पर्यटन दिन” संपन्न

सांगोला महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने “जागतिक पर्यटन दिन” संपन्न

सांगोला महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने “जागतिक पर्यटन दिन” दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. एन. शिंदे माजी भूगोल विभाग प्रमुख, श्री. शिवाजी महाविद्यालय बार्शी लाभले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी भूषवले. 
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणाले कि, पर्यटन क्षेत्र हे अलिकडे झपाट्याने विकसित होत चाललेला शाश्वत उद्योग आहे. ज्याच्यापासून पर्यावारणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही. भविष्यात विद्यार्थ्यांना या उद्योगात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या शिवाय भारतात पर्यटन क्षेत्राच्या क्षमतेनुसार जेवढा विकास व्हायला हवा होता. तेवढा विकास झाला नाही. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. पुढे ते म्हणाले पर्यटन उधोगामुळे सांस्कृतिक, सामाजिक, नैसर्गिक वारसा जपला जातो. भूगोल विभागाच्या वतीने चालवले जाणारे “पर्यटन माहिती केंद्र” याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, पर्यटन हा विषय भूगोलाशी निगडीत असल्याने भूगोलातील विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजे. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. संतोष कांबळे म्हणाले कि, पर्यटनामुळे माणूस समृद्ध होतो. त्यांनी भूगोल विभागात नवीन शैक्षणिक धोरणानुसार पर्यटन विषयाचे अभ्यासक्रमात असलेले महत्व सांगताना, भूगोल विभागाच्या वतीने चालवले जाणारे “पर्यटन माहिती केंद्र” याबद्दल आवर्जून सांगितले. 
याप्रसंगी महाविद्यालयात भारतीय हवामान विभागाच्या वतीने उभारण्यात आलेली हवामान केंद्राच्या “दैनिक हवामान अहवाल” फलकाचे उद्घाटन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे आवर्जून उपस्थित होते. हा फलक उभारणीत त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत प्रा. शंकर पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास उबाळे व कु. श्रावणी धुकटे बी. एसी भाग. १ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. अमोल पवार यांनी केले. कार्यक्रमावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. बबन गायकवाड, प्रा. प्रशांत गोडसे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments