Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्ती नंतर आनंदी जिवन जगा:प्रा.प्रबुध्दचंद्र झपके.

 सेवानिवृत्ती नंतर आनंदी जिवन जगा:प्रा.प्रबुध्दचंद्र झपके.

(पेन्शनर संघटनेतर्फे सन्मान गुरुजनांचा कार्यक्रम संपन्न*)
सांगोला प्रतिनिधी 
          थोर विचारवंत सॉक्रेटिस यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी दोन गोष्टी विसरायच्या सांगितल्या, त्या म्हणजे ज्यांना आपण मदत व उपकार केले ते विसरायचे म्हणजे अहंपणा किंवा मी पणा मुळे आनंद मिळत नाही व दुसरी ज्यांनी शिव्या, शाप, निंदा, द्वेष, तिरस्कार, केला त्या विसरा कारण जर लक्षात ठेवले तर आनंद मिळणार नाही व या पद्धतीने सेवानिवृत्तीनंतर ही प्रत्येकाने आनंदी जीवन जगा असे मत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी सन्मान गुरुजनांच्या या कार्यक्रमात पेन्शनर संघटना कार्यालय सांगोला येथे मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे हे होते. 
      आई वडील, आजोबा यांची पुण्याई व देवाचा आशीर्वाद त्यामुळे मी आनंदी आहे व माझे वडील देशभक्त गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था चांगली चालवली व त्यांच्या तत्वाला तडा जाऊ न देता आजही संस्थेचे कामकाज जोमात व चांगले आहे व त्यामुळे बाहेरच्या तालुक्यातून विद्यामंदिर कडे येण्याचा विद्यार्थ्यांचा कल ज्यादा आहे. तसेच सेवानिवृत्ती नंतर ही शिक्षकाने उर्वरित आयुष्य आनंदी जगा व गुरुवर्य साबळे गुरुजी 126 वर्षे जगणार कारण ते आनंदी आहेत व यासाठी प्रत्येकाने वामनराव पै यांचे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे लक्षात ठेवून जीवनात आनंद निर्माण करून आनंदी जगा असा मौलिक सल्ला ही प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी यावेळी दिला. सांगोला तालुका पेन्शनर संघटने तर्फे सन्मान गुरुजनांचा हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांनी यावेळी सांगितले. तसेच जीवनगौरव, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा . पी. सी. झपके, संघटनेचे सल्लागार सदाशिव साबळे गुरुजी, शंकरराव सावंत, सिद्धेश्वर झाडबुके , अभिमन्यू कांबळे व सुखदेव कदम इत्यादी गुरुजनांचा संघटनेतर्फे सत्काराचे आयोजन केले व गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे कार्य व त्यांच्यामुळे आम्ही घडलो तसेच विद्या मंदिर चे शैक्षणिक संकुल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असे ही यावेळी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांनी यावेळी सांगितले. तसेच सत्कारमूर्ती सदाशिव साबळे, सिद्धेश्वर झाडबुके, अरुण वाघमोडे, दिनकर घोडके, अंबिका शिंदे, दत्तात्रय खामकर, सुखदेव कदम इ. गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त केले.              
      सदर प्रसंगी पेन्शनर संघटनेचे उपाध्यक्ष जयवंतराव नागणे, नामदेव भोसले, खजिनदार गंगाराम इमडे, संचालिका प्रतिभा शेंडे, सुनंदा चव्हाण, एकनाथ जावीर, बापूसाहेब लवटे, लक्ष्मण सावंत, प्रभाकर कसबे, निवृत्ती मिसाळ, रविराज शेटे, पांडुरंग शिनगारे, शिवाजी इंगोले, शिवाजीराव बंडगर, पांडुरंग राऊत, जहांगीर इनामदार, आनंदा बेहेरे, एकनाथ शिंदे, अरुण टेळे, बापूसाहेब लवटे, सौ सुशीला नागणे इत्यादी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार संचालक विलास नलवडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments