Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

सांगोला महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी 

सांगोला / प्रतिनिधी:

      सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

      पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक हिंदुत्ववादी विचारवंत होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. त्यांची ही जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरी केली जाते. कारण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, समाजातील सर्वात खालच्या पायरीवर उभे असलेले गोरगरिबांचे कल्याण झाले पाहिजे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्वसामान्यांची शेती, साक्षरता, महिलांची प्रगती अशा निकषांवरसुद्धा आर्थिक प्रगतीचे मोजमाप केले पाहिजे, असे ते म्हणत. त्यामुळे वर्तमानातील जन-धन खाते, अटल पेन्शन योजना, अंत्योदय अन्न योजना ही त्यांच्या विचारांच्या रूपाला आलेली फळं आहेत. त्यांचे देशातील गोरगरिबाविषयी कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा कार्याचा आदर्श घेऊन समाजासाठी व देशासाठी चांगले कार्य करावे असे विचार यावेळी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मच्छिंद्र वेदपाठक यांनी मांडले.

      या कार्यक्रमाचे नियोजन आय. क्यू. ए. सी. कोऑर्डीनेटर डॉ. राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांनी सहकार्य  केले. तसेच श्री बाबासो इंगोले यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments