Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

अवैध वृक्षतोडीस बसणार चाप . (महाराष्ट्र शासनाच्या नवीन जीआर नुसार अवैध्य वृक्षतोड करणाऱ्यास प्रती एका झाऐ पन्नास हजार रुपये दंड)

 अवैध वृक्षतोडीस बसणार चाप .

(महाराष्ट्र शासनाच्या नवीन जीआर नुसार  अवैध्य वृक्षतोड करणाऱ्यास प्रती एका झाऐ पन्नास हजार रुपये दंड)



वाटंबरे /प्रतिनिधी :वनविभाग सोलापूर वनपरिक्षेत्र सांगोला महाराष्ट्र झाडे तोडणेबाबत 1964 कायद्यात सुधारणा 2024 विनापरवाना वृक्षतोड केल्यास प्रति झाड पंन्नास हजार रूपये दंड महाराष्ट्र शासनाने नवीन जीआर नुसार चालू केला आहे.

मालकी क्षेत्रातील झाडेतोड करणेबाबत महाराष्ट्र वृक्षतोड नियमन 1964 च्या वृक्षतोडीच्या कायद्यात (नियमात) सुधारणा झाली असून विनापरवाना वृक्षतोड केल्यास वनविभागाचा परवाना न घेता झाडे तोड केली तर दंडात्मक रक्कम एका झाडास पंन्नास हजार रूपये शासनाने केली आहे. त्यासंबंधी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दि.06.09.2024 आहे. त्यानुसार सुधारणा केली आहे. RNI MAHBIL/2009/35530 सन 1964 चा महाराष्ट्र अधिनियम 34 च्या कलम 4 मध्ये सुधारण केली आहे. पुर्वी 1964 पासुन ते 5.9.2024 पर्यंत एक झाड विनापरवाना तोड केली तर प्रति झाड एक हजार रूपये दंड केला जात होता. दि.06.09.2024 पासून दंडाची रक्कम महाराष्ट्र शासनाने वाढ केली आहे. आता एक झाड विनापरवाना तोड केले. वनविभागाचा परवाना न घेता तोड केले तर पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनापरवाना वृक्षतोड करू नये. वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी व वनविभागाचा वाहतूक पास परवाना घेतल्यानंतर वाहतूक करावी. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम 1964 मधील कलम 3 अन्वये अधिकार प्रधान केलेला आहे. वृक्षअधिकारी चौकशी केल्यानंतर आणि आशा व्यक्तीस बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर दंड करतात. सदरचा अधि नियम नागरी क्षेत्र वगळून संपुर्ण राज्यात लागू आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे तोड बंद करण्यासाठी कठोर दंडाची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रति झाड दंडाची रक्कम पन्नास हजार रूपये अशी सुधारणा केली आहे.





चौकट:

दि.06 सप्टेंबर 2024 पासुन प्रसार माध्यमांनी या संदर्भात बातमी दिली आहे. वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतर वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक परवाना घेतल्यानंतर वाहतूक करावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी केले आहे. अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास 9420378279 या फोन नंबरवर संपर्क करावा.

.

Post a Comment

0 Comments