पुणे प्रतिनिधी / कांता राठोड :
22/09/2024 रोजी
संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना पुणे जिल्हा नियोजीत दैरा आखण्यात आला होता. यावेळी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राज्य समन्वयक मा.पंडित भाऊ राठोड यांचा तळेगाव दाभाडे येथील टोल नाक्याजवळ पुणे जिल्हा राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला व दौऱ्याला तिथून सुरुवात करण्यात आली यावेळी तळेगाव दाभाडे, मावळ तालुका, खेड, भोसरी ,खडकी, वारजे ब्रिज, रामनगर तांडा, उत्तम नगर तांडा मागडेवाडी या सर्व ठिकाणी तांड्यांना भेटी देण्यात आल्या व तांड्यातील लोकांना संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना याच्याविषयी माहिती देण्यात आली. व प्रत्येक तांड्यातील नायक, कारभारी व उपस्थित नागरिकांच्या समोर माहिती पुस्तिका देण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती पंडित भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद महासचिव भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राज्य समन्वयक ,तसेच रवि राठोड पुणे विभाग प्रमुख,व पुणे जिल्हा सदस्य प्रेमकिसन राठोड,नाना भाऊ राठोड, अनिल नाईक , कविता आडे, किसन महाराज लाधीवली महंत , राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रेमकिसन राठोड प्रदेश उपाध्यक्ष,अमोल भाऊ पवार प्रदेश प्रवक्ता , लक्ष्मण भाऊ राठोड उद्योजक, अनिल नाईक उद्योजक चंदर भाऊ राठोड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, नाना भाऊ राठोड पुणे जिल्हा अध्यक्ष,पुणे शहर अध्यक्ष सागर भाऊ राठोड, पुणे शहर उपाध्यक्ष संदीप भाऊ जाधव, पुणे जिल्हा मीडिया प्रमुख अनिल भाऊ चव्हाण, तसेच पत्रकार, झेप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कांता भाऊ राठोड, संतोष राठोड,अकाश राठोड व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंडित भाऊ राठोड यांनी तांड्यातील लोकांना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून तांड्याचा विकास कसा केला जाईल व त्यातून आपल्या भगीनी तसेच आपल्या मुलांचे शिक्षण आरोग्य व सर्व सुख सुविधा महाराष्ट्र सरकार कडून कशा मिळवून घेता येतील या संदर्भात सविस्तर माहिती दिली यामुळे उपस्थित बंजारा समाजातील लोकांनी पंडित भाऊ राठोड व तांडा समृद्धी योजनेच्या निमशासकीय सदस्य व राष्ट्रीय बंजारा परिषद पदाधिकारी व कार्यकर्ते याचेआभार मानले
0 Comments