पंढरपूर येथील श्रद्धा डुबल यांची पुणे विभागातून जलसंपदा विभागात स्थापत्य अभियंता या पदी निवड.
पंढरपूर येथील श्रद्धा महादेव डुबल यांची पुणे विभागातून जलसंपदा विभागात स्थापत्य अभियंता या पदी निवड झाली . तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेमध्ये झाले उच्च शिक्षण बीटेक हे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून तिने पूर्ण केले. लहानपणापासून आजी राजाक्का व आजोबा तानाजी बापू पवार व मामा आण्णासाहेब पवार यांच्या जवळ राहून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले .
तिच्या या शिक्षणात आजी आजोबा मामाचा सिंहांचा वाटा आहे. पंढरपूर एलआयसी विभागात कार्यरत असणाऱ्या आई वर्षाराणी व वडील महादेव लक्ष्मण डुबल व पती वैभव वाडेकर यांच्या अथक परिश्रमाने तिने हे यश प्राप्त केले आहे. तिच्या या निवडीमुळे तिचे नातेवाईक, मित्रपरिवारातुन कौतुक करत तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.
माझ्या यशात आई, वडील,आजी, आजोबा मामा, मामी व माझे सासु,सासरे ,पती , मित्र परिवार व माझ्या शाळेतील सर्व शिक्षक वर्गाचा सिंहांचा वाटा आहे या सर्वांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या सहकार्यामुळे मी हे यश प्राप्त केले आहे त्यामुळे मी या सर्वांची ऋणी आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा