Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

प्रियांका पवार हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन महाराष्ट्र शासनामार्फत सांख्यिक अधिकारी म्हणून निवड.

प्रियांका पवार हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन महाराष्ट्र शासनामार्फत सांख्यिक अधिकारी म्हणून निवड.

वाटंबरे /प्रतिनिधी: वाटंबरे गावचे प्रगतशील बागायतदार ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद पवार यांची सुकन्या प्रियांका प्रल्हाद पवार हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन महाराष्ट्र शासनामार्फत सांख्यिक अधिकारी म्हणून निवड .
प्रियांका पवार हिचे शालेय शिक्षण वाटंबरे येथील शिंदे वस्ती तुकाराम नगर येथे प्राथमिक शिक्षण , माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेत , पदवी शिक्षण डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे , पदव्युत्तर शिक्षण पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या ठिकाणी पुर्ण केले.
प्रियांका पवार हिची महाराष्ट्र शासनामार्फत सांख्यिक अधिकारी म्हणून निवड झाल्याने सांगोला तालुका तसेच नातेवाईक मित्रपरिवारातुन तिचे कौतुक केले जात आहे तसेच तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.


माझ्या यशात आई, वडील, 
भाऊ,शिक्षक वर्ग , नातेवाईक, 
मित्रपरिवाराचा  सिंहांचा वाटा आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart