Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे खेराडे वांगी येथे प्रबोधन

*गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे खेराडे वांगी येथे प्रबोधन* 

नाझरे प्रतिनिधी 
          श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचाच सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे. 
          जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होती व यासाठी संत तुकाराम महाराज मंदिर खेराडे वांगी ता. कडेगाव. जि. सांगली येथे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. 
            सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आवाहन संतोष सूर्यवंशी, सौ रुपाली सूर्यवंशी, रिया सूर्यवंशी, उमा सूर्यवंशी, सौ. मोहिनी महाडिक यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart