Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

वाटंबरे वि. से. सोसायटीच्या चेअरमन पदी खंडू पवार व व्हा.चेअरमण पदी विठ्ठल पवार यांची निवड.

 वाटंबरे वि. से. सोसायटीच्या चेअरमन पदी खंडू पवार व व्हा.चेअरमण पदी विठ्ठल पवार यांची निवड.




वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथील वि.से..सोसायटीचे चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी  ग्रामपंचायत कार्यालय वाटंबरे येथे पार पडली.

विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नाना बापू पवार व व्हा. चेअरमन खंडू रामचंद्र पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते .

 चेअरमन या रिक्त झालेल्या पदासाठी  शिवसेनेचे खंडू मुरलीधर पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली तसेच व्हा. चेअरमन  पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल ज्ञानू पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने  त्यांची व्हा. चेअरमन पदी निवड करण्यात आली .




  





ही निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी ए.डी.गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. यावेळी वि.से. सोसायटीचे सचिव पंडीत दिवसे , सहाय्यक निबंधक सहकार संस्था सांगोला येथील घोडके साहेब, ग्रामपंचायत सरपंच नामदेव पवार  सर्व सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य  , यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी नुतन चेअरमन खंडू मुरलीधर पवार व व्हा. चेअरमण  विठ्ठल ज्ञानू पवार यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच माजी  चेअरमन नाना बापू पवार, उप चेअरमन खंडु पवार यांचेही सत्कार  यावेळी करण्यात आले.    यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ  उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart