वाटंबरे : वाटंबरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवा उद्योजक खंडू पवार यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचा गुरुमाऊली औषधालय तर्फे उद्योजक बंडू पवार व डॉ.महादेव बंडगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी नूतन चेअरमन खंडू पवार यांनी विकास सेवा सोसायटी मार्फत जे शासनाचे उपक्रम आहे ते सर्व उपक्रम आपल्या सोसायटी मार्फत राबिण्यात येऊन गावच्या विकासात हातभार लावण्याचे ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक औषधालयचे प्रोप्रायटर मल्हारी पवार,सूत्रसंचलन डॉ.अरुण पवार, आभार इकबाल पाटील यांनी मानले यावेळी दिगंबर साळुंखे सर,शिवाजी अलदर , प्रतीक पवार,सुखदेव पवार,दादासो पवार,निलेश धनवडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा