सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित सांगोला महाविद्यालयात मंगळवार दि.23 जुलै 2024 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .या वेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अर्जुन मासाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मराठी विभागप्रमुख डॉ. बबन गायकवाड यांनी लोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाचे योगदान होते. त्यांच्या कार्याबदद्ल लोकांना आदर होता असे मत व्यक्त केले तसेच त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा