Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ९ जून, २०२४

प्रभार क्लिनिकचा उद्घाटन सोहळा ‌.

 प्रभार क्लिनिकचा उद्घाटन सोहळा ‌.



श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कै. प्रमोद कुलकर्णी यांचे पुत्र डॉ. प्रद्युम्न कुलकर्णी व सौ. मृणालिनी कुलकर्णी यांनी चालू केलेल्या प्रभार क्लिनिकल चा उद्घाटन सोहळा रविवार दि. ९ जून रोजी संपन्न झाला. महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध असणारे बलवडी येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. शिवाजीराव ढोबळे यांच्या हस्ते फित कापुन उद्घाटन करण्यात आले 

यावेळी पत्रकार संघटनेमध्ये विविध पदावर कार्यरत असणारे दैनिक सांगोला नगरी व माणदेश नगरीचे संपादक सतीश भाऊ सावंत, उमेश खंडागळे, सरपंच नामदेव पवार , उपसरपंच मोनिका निकम हे मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ.ढोबळे यांनी वैद्यकीय क्षेत्राबद्दल माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले डॉ. प्रद्युम्न कुलकर्णी व डॉ. मृणालिनी कुलकर्णी यांनीही वैद्यकीय क्षेत्राबद्दल माहिती देत प्रभार क्लिनिकच्या माध्यमातून चोवीस तास रुग्णांची सेवा करण्याचे वाटंबरे ग्रामस्थाना आश्वासन दिले.

यावेळी डॉ.दबडे, माजी सरपंच किरण पवार, हणमंत निकम ,विजय पवार, महादेव बापू पवार, भारत धनवडे, सूर्यकांत मिसाळ, संजय पवार, बबन तात्या पवार ,समाधान पवार, केशव पवार ,सुभाष पवार व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ यावेळी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart