हवालदार संजय जाधव महासंचालक पदाने सन्मानित.
पुणे /प्रतिनिधी :संजय पंढरीनाथ जाधव. २५७२ पोलीस हवालदार . हे १९९७रोजी पोलीस दलात मुंबई येथे रुजू झाले. मुंबईनंतर ते २००५ साली पुणे शहर पोलीस येथे आले. आत्तापर्यंत त्यांनी पोलीस मुख्यालय, विश्रामबाग पोलीस स्टेशन,भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि आत्ता सध्या पुणे शहर गुन्हे शाखा युनिट दोन येथे काम करीत आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या २८ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना दि.१ मे रोजी पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित केले. माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार. पुणे शहर यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे त्यांना सन्मानित करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा