Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ३ मे, २०२४

ड्रीम्स फॉर विंग्स या संस्थेचा मतदान विषयी कलाकार कट्टा एफ.सी रोड पुणे येथे जन जागृती उपक्रम *

  ड्रीम्स फॉर विंग्स या संस्थेचा मतदान विषयी कलाकार कट्टा एफ.सी रोड पुणे येथे जन जागृती उपक्रम *




पुणे /प्रतिनिधी:

"एका -एका मताने बनते-पडते सरकार,

म्हणून तुम्ही तुमचे मत करू नका बेकार"

आज 3 मे रोजी विंग्स फॉर ड्रीम च्या माध्यमातून नवीन उपक्रम राबवण्यात आला. येत्या 19 एप्रिल ला मतदान आहे. संपूर्ण महाराष्ट्र याची अतिशय उत्सुक पणे वाट पाहत आहे. प्रत्येक जन वेग वेगळ्या पक्षा साठी आपले मत जाहीर करत आहे. एक मत किती महत्वाचे आहे याविषयी जनजागृती करण्यासाठी विंग्सफॉर ड्रीम च्या माध्यमातून फलक बनवण्यात आले. या प्रत्येक फलकावर वेग वेगळ्या प्रकारचे स्लोगन लिहून ते सर्व सामान्य लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यात आले. सोबतच पथनाट्य मधुन लोकांपर्यंत जनजागृत्ती पसरवण्यात आली,की तुमचे मतदान किती महत्वाचे आहे. या कार्यक्रमातून लोकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करून आपले महत्व पटून देण्याचे काम करण्यात आले. हा कार्यक्रम फर्ग्युसन रोड कलाकार कट्टा या ठिकाणी कारण्यात आला. 

या वेळीस सोबत विंग्स फॉर ड्रीमचे 20 ते 25 स्वयंसेवक उपस्तिथ होते. या वेळीस भरपूर लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिला.यावेळीस संस्थेचे अधिकारी रिचार्ड सर , उपस्थित होते .सोबतच विंग्स चे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या मध्ये अजय महानवर,सोहित कांबळे, ,वेंकी आकाश कांबळे तसेच AIISMS कॉलेज चे विधार्थी सोबत होते. आदी कर्मचारी वर्ग आणि सोबतच कॉलेज विद्यार्थी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघांचे सचिव व बाळकडू पत्रकार सतीशकुमार कोकरे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart