Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, ३ मे, २०२४

मोराळे येथील नियोजित श्री दत्त मंदिरास मदत करा - गुरुवर्य भालचंद्र पाटील काका*

*मोराळे येथील नियोजित श्री दत्त मंदिरास मदत करा - गुरुवर्य भालचंद्र पाटील काका*

नाझरे प्रतिनिधी
                   जात, धर्म, पंथ देवाला लागत नाही तर देव तुमचा होवो व तुम्ही देवाची हो वो यासाठी प्रत्येकाने निष्ठेने भक्ती करा व सुख, शांती, समाधानासाठी श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा व मोराळे येथील नियोजित दत्त मंदिराच्या बांधकामासाठी मदत करा असे आवाहन गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी घोरपडी ता. कवठेमंकाळ येथे प्रबोधनात केले.
             भक्ती करताना निष्ठा काय कामाची यासाठी गुरुचरित्र वाचा व त्यामध्ये परीट राजा झाला व महिलेचा नवरा मृत्यूनंतर जिवंत कसा झाला यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करून निष्ठेने भक्ती करा व गुरुचरित्र ग्रंथ वाचा तसेच गाणगापूर व एकदा मोराळला भेट द्या म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती व शिवदत्त महाराज यांचा महिमा कसा आहे हे समजेल. परंतु मांसाहार, मद्यपान करू नका व प्रत्येकाने सकाळ, संध्याकाळ किंवा किमान एक वेळ तरी दोन अगरबत्ती देवास लावून त्या संपेपर्यंत दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त असे नामस्मरण करा त्यामुळे तुमची शारीरिक व्याधी कमी होईल व जीवनात सुख, शांती, समाधान मिळेल. तसेच परमेश्वराने आपणास मानव जन्म दिला व पुढचा जन्म चांगला मिळण्यासाठी देवाच्या गळ्यातील ताईत व्हा व भक्ती करा असा उपदेश भालचंद्र पाटील काका यांनी यावेळी केला.
           सदर प्रसंगी पत्रकार रविराज शेटे यांचा सत्कार काकांचे हस्ते करण्यात आला. यावेळी घोरपडी येथील सरपंच नितीन कांबळे, उपसरपंच संपत नरळे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत नरळे, विष्णू टोणे, गोविंद नरळे, सिताराम खरात, गजानन भागवत, ओंकार भागवत, दत्ता बुवा भडंगे, मधुकर नरळे, महादेव टोणे, दत्ता दिवटे, विठ्ठल लाटणे, बयाजी टोणे, स्वामीभक्त सूर्यकांत पाटील, रवींद्र स्वामी, राहुल शिंदे, धनंजय जगताप, राजेंद्र पिंपळे, शिवाजी लोखंडे, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart