गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे रेंदाळ येथे प्रबोधन*
*गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे रेंदाळ येथे प्रबोधन*
नाझरे प्रतिनिधी
श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे.
जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होती व यासाठी विठ्ठल मंदिर रेंदाळ ता. हातकणंगले येथे सोमवार दिनांक 3 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आवाहन प्रफुल्ल विभूते, निखिल विभुते, हर्षल विभुते यांनी केले आहे.

No comments