Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

कै. सत्यभामा मिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह. भ .प .डॉ अमित महाराज डोके यांचे कीर्तन संपन्न.

 कै. सत्यभामा मिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह. भ .प .डॉ अमित महाराज डोके यांचे कीर्तन संपन्न.



सांगोला तालुका वाटंबरे येथे नाझरे येथील श्रीधर संजीवा महाराज यांचे शिष्य कै.ह.भ.प. विनायक मिसाळ गुरुजी (आबा)  यांच्या पत्नी कै.सत्यभामा विनायक मिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त गुरुवार दि. ३० मे रोजी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध  ह. भ .प. डॉ. अमित महाराज डोके रा.आष्टी जिल्हा बीड यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


वाटंबरे येथील वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले मिसाळ कुटुंबीयांच्या वतीने कै.सत्यभामा विनायक मिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


यावेळी ह. भ .प .डॉ. अमित महाराज डोके रा.आष्टी जिल्हा बीड यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितना  मंत्रमुग्ध केले या कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर कै. सत्यभामा मिसाळ यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर मिसाळ परिवार, वाटंबरे ग्रामस्थ  नातेवाईक व मित्र मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



No comments