Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ४ मे, २०२४

वाटंबरे येथे जागृत देवस्थान खंडोबाला श्रीफळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ.

 वाटंबरे येथे जागृत देवस्थान खंडोबाला श्रीफळ वाढवून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ.


वाटंबरे /प्रतिनिधी : पन्नास ते साठ वर्षे झाले सांगोला तालुका हा पाण्यापासून वंचित होता माढा लोकसभा मतदारसंघाचे  उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर ,तालुक्याचे आ. शहाजी बापू पाटील, दीपक आबा साळुंखे यांनी पाण्याच्या स्वरूपात विकासाची गंगा सांगोला तालुक्याला आणली  या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास झाला तालुक्याचे आ. शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांनी वाटंबरे गावाच्या  विकास कामाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे पाठीमागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी पुढील निवडणूक ही पाण्यावर होणार नाही असा शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द खरा करून लावलेला आहे ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत त्यामुळे सर्वांनी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना वाटंबरे गावातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य द्यावे असे भाजपचे सरचिटणीस मधुकर पवार हे महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.  

वाटंबरे येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ  वाटंबरे येथील जागृत देवस्थान खंडोबा मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला .
या वेळी शिवसेनेचे युवा नेते विकास पवार व दत्तात्रय पवार यांनी ही आपले मनोगते या वेळी व्यक्त केली.
ज्या खंडोबा देवस्थान मध्ये वाटंबरे गावच्या बिनविरोध ग्रामपंचायतीचे मुळे रुजली गेली त्या 
जागृत  खंडोबा देवस्थानला श्रिफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महायुतीचे नेते सुब्राव बापू पवार,विजय पवार,  नाना बापू पवार , सुखदेव पवार, मधुकर पवार, धनाजी पवार,खंडु पवार,अनिल पवार, विकास पवार, भाग्यवान पवार ,श्रीधर पवार,प्रतिक पवार, सिद्धेश्वर पवार, बिरा गेजगे, अविनाश पाटोळे, उमेश गायकवाड, मल्हारी पवार ,सदाशिव पवार ,चव्हाण गुरुजी, धीरज पवार ,संजय पवार ,अविनाश पाटोळे, सुभाष पाटोळे ,भारत पवार, हनमंत निकम, उद्यसिंग गायकवाड, बटू पवार सर, आण्णासो निकम 
तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart