Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

डॉ.परेश खंडागळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी सोलापूर जिल्हा (माढा ग्रामीण) संयोजकपदी निवड.

 डॉ.परेश खंडागळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी सोलापूर जिल्हा (माढा ग्रामीण) संयोजकपदी निवड.




सांगोला (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या माढा ग्रामीण वैद्यकीय आघाडी संयोजकपदी डॉ.परेश खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेच त्यांना डॉ रवींद्र अरळी संचालक सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी निवडीचे पत्र दिले


सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश व भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी डॉ. अजित गोपछडे सर यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी माढा ग्रामीणच्या संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖

डॉ.परेश खंडागळे गेली अनेक वर्ष आरोग्य, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहेत. या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी असलेला सलोखा व सेवाग्रतीभाव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी व पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहविण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.


 या निवडीबद्दल वैद्यकीय आघाडी, महाराष्ट्राचे संयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे, सहसंयोजक रविंद्र आरळी तसेच मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. श्री. शशिकांत भाऊ देशमुख,मा.श्री. श्रीकांतदादा देशमुख  यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सांगोला तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होते आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart