जनसंपर्क सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी जयश्री सावंत यांची निवड.
जनसंपर्क सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी जयश्री सावंत यांची निवड.
सांगोला प्रतिनिधी
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली व भारत संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला जनसंपर्क प्रमुख विजया कर्णवर यांच्या सहमतीने सोलापूर जिल्हा महिला आघाडी जनसंपर्कप्रमुख पदी जय श्री मल्हारी सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
नागरिक व पोलीस यांना मदत करून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदर संघटना कार्यरत असून, जिल्हाप्रमुख पदी जयश्री सावंत यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व संघटनेची प्रतिमा जनसमुदायांमध्ये उज्वल करून आपण महिला, नागरिक व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू अशी निवडीनंतर सावंत यांनी सांगितले.

No comments