कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन.
नाझरे प्रतिनिधी
ब्रेकिंग न्यूज :
गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी, उत्तराधिकारी गुरुमुर्ती गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज गुरु गादी मठ कोळे येथून मंगळवार 15 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता पायी दिंडी कोळे ते शिखर शिंगणापूर निघणार असून, सोबत मासोळीकर महाराज व महादेव महाराज हे पण महास्वामी सोबत पायी निघणार आहेत तरी गुरु सहवासाचा व शिव चिंतनाचा लाभ घेण्यासाठी कोळेमठात ता. सांगोला 14 एप्रिल रोजी मुक्कामास शिवभक्तांनी हजर राहावे असे आवाहन मठातर्फे व वीरशैव समाज कोळे तर्फे करण्यात आले आहे.
सदर दिंडीमध्ये महादेव महाराज हिंगणगाव, सौ रेखाताई शिंदे सोमेश्वर देवस्थान हातीद, वीरभद्र देवस्थान नाझरे, रुद्र पशुपती दिंडी केमवाडी इत्यादी दिंड्या सहभागी होणार आहेत. सोमवार 15 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता प्रयाण दुपारी शेटफळ येथे विश्रांती व सायंकाळी आटपाडी मठात मुक्काम, मंगळवार 16 एप्रिल रोजी आटपाडी मधून सकाळी सहा वाजता पर्यंत दुपारी दिघंची येथे विश्रांती व सायंकाळी राजेवाडीस मुक्काम, बुधवार 17 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता राजेवाडी मधून प्रयाण दुपारी मसवड येथे विश्रांती व सायंकाळी मार्डीस मुक्काम, गुरुवार 18 एप्रिल रोजी सकाळी मार्डी मधून सहा वाजता प्रयाग दुपारी शिंगणापूर येथे मुक्काम होईल.
गुरुवार 18 एप्रिल ते शनिवार 20 एप्रिल अखेर श्री क्षेत्र शिंगणापूर येथे परम रहस्य ग्रंथाची पारायण व व्यासपीठ चालक सौ जयश्री शीलवंत या राहतील. तसेच 19 एप्रिल रोजी दयानंद नागापल्ली यांचे कीर्तन व 20 एप्रिल रोजी पारायण समाप्ती व प्रसादाचे कोळेकर महास्वामी चे किर्तन होईल तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन महादेव अण्णा चिवटे यांनी केले आहे.
🔰


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा