चिनके गावची स्नेहल विनायक मिसाळ हिची शिल्प निर्देशक पदी निवड*
*चिनके गावची स्नेहल विनायक मिसाळ हिची शिल्प निर्देशक पदी निवड*
नाझरे प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय यांच्या वतीने 2022 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये स्नेहल विनायक मिसाळ(B.E .Mechanical M. Tech . Energy MSW) तिची शिल्पनीदेशक पदी निवड झाली आहेे. मा.प्राचार्य विनायक जगन्नाथ मिसाळ यांची कन्या व कै. जगन्नाथ पंढरीनाथ मिसाळ , चिणके यांची नात आहे. तिचे लहानपणापासूनचे शिक्षण सातारा व कोल्हापूर येथे झाले आहे.ती लहानपणापासूनच हुशार, जिद्दी आणि धडपडी वृत्तीची आहे.ती म्हणते की मला मिळालेले यश हे केवळ माझं यश नसून ते माझ्या माहेरच्या, सासरच्या आणि गावाकडील ग्रामस्थांच्या शुभाशीर्वादाने मिळालेले यश आहे. त्याबद्दल मी मनापासून माझ्या,परिवाराची ,ग्रामस्थांची, ऋणी आहे .सध्या तिचे पोस्टिंग कराड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे झालेले आहे. तिच्या या मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .ती श्री माणिक मिसाळ, श्री.शरदचंद्र मिसाळ वकील, श्री सज्जन मिसाळ , (गुरुजी,)यांची पुतणी आहे.


No comments