आदलिंगे-श्रीरामवस्ती कमलापूर शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न:-
आदलिंगे-श्रीरामवस्ती कमलापूर शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न:-
शाळेच्या इतिहासातील पहिल्याच संमेलनाला आले उत्सवाचे स्वरूप:-
कमलापूर ता. सांगोला येथील आदलिंगे-श्रीरामवस्ती या शाळेचे दर्जेदार, भरगच्च व विविधरंगी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेले हे स्नेहसंमेलन गुरूवार दिनांक १४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७वा. संपन्न झाले.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कमलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सतिश तंडे, कार्तिकेय दूध संकलन केंद्राचे चेअरमन बंडू तंडे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव पडवळे, प्रतिष्ठीत नागरिक जालिंदर आदलिंगे व मुख्याध्यापक संभाजी पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात "तू सुखकर्ता" या गणेश वंदनेने तर भक्तीगीत, बालगीत, देशभक्तीपर गीत, वासुदेव, वाघ्या-मुरळी, भारूड, धनगरी, आदिवासी, कोळी, शेतकरी, लावणी, जुन्या-नव्या मराठी व हिंदी गाण्यांचे रिमिक्स, नवरात्र इत्यादी नृत्ये तर बहुरूपी, मूकनाट्ये व जादूच्या प्रयोगाने तब्बल ४ तासांच्या या विविधरंगी, चित्तवेधक, मनोरंजक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ५वी. ८वी. शिष्यवृत्ती परीक्षा व एन. एम. एम. एस. या शासकीय परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेले ११ माजी विद्यार्थी तर गतवर्षीच्या "अक्षरगंगा" व "ए. टी. एस" या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील १५ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा त्यांच्या मातापित्यांच्या समवेत प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला
(((((((((((((चौकट))))))))))))
तसेच शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी १० हजार रुपयांचे दप्तर वाटप केलेल उद्योगपती अशोक आदलिंगे, बालदिंडीसाठी अल्पोपहार व्यवस्था केलेले गणेश आदलिंगे, अनिल पडवळे, शालेय पोषण आहारासाठी सर्व विद्यार्थ्यांना स्वेच्छेने अंडाकरी वाटप केलेल्या सीमा पडवळे, इडली सांबर वाटप केलेल्या सानिका टाकळे व सारीका श्रीराम, हळदीकुंकू समारंभासाठी चहापान व अल्पोपहार व्यवस्था केलेल्या शालन पडवळे, खरबूज वाटप केलेल संतोष टाकळे आदी पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
(((((((((((चौकट))))))))))))))
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ पडवळे, रावसाहेब पडवळे, श्रीधर देवकते, विजय देवकते, अंकुश टाकळे, सुभाष टाकळे, संतोष टाकळे, गणेश आदलिंगे, विजय आदलिंगे, सतिश आदलिंगे, पिराजी आदलिंगे, पप्पू आदलिंगे, ज्ञानू श्रीराम व सर्व पालकांनी श्रम घेतले.
((((((((((((चौकट)))))))))))))
तब्बल ४ तास चाललेला या सांस्कृतिक कार्यक्रमात परीसरातील अबालवृद्धांनी बालकलाकारांनी सादर केलेली २९ वेगवेगळ्या नृत्यांचे अविष्कार, विनोदी ढंगाची बहुरूप्याची कला, पश्चात्ताप हे मुकनाट्ये व जादूचा प्रयोग आदी ३२ कलाविष्कारांना टाळ्या व रोख बक्षीस देऊन भरभरून प्रतिसाद दिला. चिमुकल्यांच्या चित्तवेधक कला, विविध गाण्यांच्या सुमधुर संगीताने आनंदीत झालेला परीसर, माजी विद्यार्थ्यांचा पालकांसह पार पडलेला यथोचित सन्मान, स्वादिष्ट स्नेहभोजनाचा बेत व कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडलेला हा सोहळा जणू या परीसराठी एक उत्सवच ठरला हे मात्र नक्की..
(((((((((((चौकट))))))))))))))
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुसो भंडगे व सानिका टाकळे यांनी केले. तर आदलिंगे, पडवळे, टाकळे, देवकते, श्रीराम, मेटकरी व इरकर परीवारातील सर्व पालक, मान्यवर व साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर सुखदेव बंडगर तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या योगदान दिले त्या सर्वांचे मुख्याध्यापक संभाजी पवार यांनी आभार मानले.



No comments