वाटंबरे बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच पदी नामदेव पवार यांची निवड.
वाटंबरे बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच पदी नामदेव पवार यांची निवड.
वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे ग्रामपंचायत नूतन सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे नामदेव पवार यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच किरण पवार यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी २२ मार्च शुक्रवारी वाटंबरे ग्रामपंचायत या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली सरपंच पदासाठी नामदेव काशिनाथ पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना सरपंच घोषित करण्यात आले.
ही निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी यु.जे. पोळके मंडल अधिकारी सोनंद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ग्रामविकास अधिकारी एस .एन .मेटकरी व तलाठी बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.
यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य , शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments