Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ३१ मार्च, २०२४

शक्तीपीठ महामार्गासाठी एकरी दोन तर मनपालगत अगर एमआयडीसी झोनबाबत चार कोटींची शेतकऱ्यांची भरपाईची मागणी.

 शक्तीपीठ महामार्गासाठी एकरी दोन तर मनपालगत अगर एमआयडीसी झोनबाबत चार कोटींची शेतकऱ्यांची भरपाईची मागणी.


   {शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यां च्या मेळाव्या त कवलापूर येथे निर्णय*} 

नाझरे प्रतिनिधी

               शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असून या महामार्गाची कुणीही मागणी केली नाही व शेतकऱ्यावर लादलेला अन्यायी महामार्ग रद्द करावा व प्रशासनाने महामार्गासाठी वाटाघाटी करायची असेल तर शेतकऱ्याच्या बांधावर येऊन करावी व बाधित क्षेत्राला एकरी दोन कोटी रुपये मोबदला सरसकट जाहीर करा व एमआयडीसी झोन व महानगरपालिका क्षेत्रालगत असल्यास एकरी चार कोटी मोबदला द्या व त्याशिवाय महामार्गाचे काम सुरू करू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा कवलापूर जिल्हा सांगली येथे शेतकरी मेळाव्यात देण्यात आला.

             नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी, संघर्ष समिती व शेतकरी कामगार पक्ष वतीने सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा कवलापूर येथील महादेव मंदिर येथे पार पडला यावेळी सर्वांचे स्वागत भूषण गुरव यांनी तर प्रास्ताविक घनश्याम नलवडे यांनी केले. यावेळी संविधानात कोणतेच कायदे माणसाला उध्वस्त करणारे नाहीत उलट माणसांना संरक्षण देणार आहेत परंतु शासनाने मागणी नसताना नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग काढला व शासन जमिनी खरेदी करणारा असेल तर बाधित शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी दोन कोटी व महानगरपालिका व एमआयडीसी झोनचे क्षेत्रास एकरी चार कोटी द्या अशी एक मुखाने सर्वांनी मागणी मेळाव्यात केली व कवलापूर संघर्ष लढ्याचे केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.


             शक्ती पीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्याचा दहा दिवसाचा दौरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला व सांगली जिल्हा समन्वयक पदी घनश्याम नलवडे तर सोलापूर जिल्ह्यासाठी सागर बिले व कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलीप खोत याची निवड करण्यात आली. यावेळी शरद पवार, प्रवीण पाटील, गजानन सावंत, विष्णू सावंत, भूषण गुरव, रमेश कांबळे, शिवाजी शिंदे, राहुल जमदाडे, महेश बिले, आनंदा मोरे, हनुमंत सावंत, नंदकुमार माळी, ओम कुंभार, शिवराज पाटील, प्रकाश टकले, राहुल खाडे, शेतकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

          *शक्तीपीठ विरोधात राज्यव्यापी आंदोलन* 

       *शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो हरकती दाखल असून, सुनावणी वेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडावी व प्रांताधिकारी यांनी सुनावणी घेत असताना गाववार सुनावणी घ्यावी व बाधित शेतकऱ्याला न्याय द्यावा अन्यथा शक्तिपीठ महामार्ग विरोधात बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबासह, जनावर असं राज्यव्यापी आंदोलन उभे करणार  - भाई दिगंबर कांबळे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart