कोंढवा येथे भव्य आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न.
पुणे /प्रतिनिधी:
कोंढवा येथील वैष्णवी वेलनेस सेंटर मध्ये जागतिक आरोग्य सल्लागार प्रेसिडेंट टीम संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.या कार्यक्रमात बदलत्या जीवनशैलीनुसार घ्यावयाचा सकस आहार ,नियमित वर्कआउट व डाएटबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री के.डी. वाघ, संभाजी तायडे ,संतोष खोंडे,योगेश सोनवणे यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जवळपास पुणे शहरातील 125 जण उपस्थित होते.याप्रसंगी आहार विषयक विविध ऑनलाइन स्लाईड दाखवण्यात आल्या.
दैनंदिन व्यायामाबद्दल विशेष जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जागतिक आरोग्य सल्लागार मनीषा मराठे,पायल लिंभोरे, नवनाथ गायकवाड, अश्विनी गायकवाड सायली गायकवाड ,पूजा लिंबोरे ,नंदकुमार मराठे,मयुरी शिंदे,सुवर्णा पिंगळे,नीलम पिंगळे,रेखा टिळेकर,उर्मिला येवले,मनिष कुमार सिंह,साक्षी लिंबोरे यांच्यासह अनेकांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप लोणकर,संतोष भोईटे,मानसी लोणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा