सांगोला तालुका वाटंबरे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मारुती मंदिरासमोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वाटंबरे गावचे प्रथम नागरिक सरपंच किरण पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित असणाऱ्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा दील्या . प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेशभूषा परिधान करून पथनाट्यद्वारे शिवकालीन जिवंत देखावे सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली तसेच यावेळी त्यांनी लेझीम नृत्य सादर केले शेवटी त्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपले मनोगते व्यक्त केली . यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रशालेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विद्यार्थी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळातील सर्व सदस्य व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते . सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या उत्सवात मिरवणूक संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा