महामार्ग सुरक्षा पोलीस सांगोला तर्फे नाझरे विद्या मंदिर हायस्कूल ज्युनिअर कॉलेज प्रशालेत रस्ता सुरक्षा अभियान संपन्न.
महामार्ग सुरक्षा पोलीस सांगोला तर्फे नाझरे विद्या मंदिर हायस्कूल ज्युनिअर कॉलेज प्रशालेत रस्ता सुरक्षा अभियान संपन्न.
वाटंबरे /प्रतिनिधी: नाझरे ता .सांगोला येथील नाझरे विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पोलीस सांगोला यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान संपन्न झाले . यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद थिटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतुकीच्या नियमाची व कायदेशीर कारवाईची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे आव्हान केले.
यावेळी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक आनंद थिटे यांचा सत्कार करण्यात आला.
या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमा वेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खालील प्रमाणे वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
1) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर करू नये.
2) कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.
3) ट्रिपल सिट प्रवास करु नये.
4) दारू पिवून वाहन चालवू नये.
5) मो/सा चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा.
6) वाहन अतिवेगात चालवू नये.
7) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.
8) वाहन चालविताना वेग मर्यादेचे पालन करावे.
9)विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
10) वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.
11) चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट वापरावे.
12) मोटर सायकल चालवताना नेहमी सर्व्हिस रोड चा वापर करावा ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसेल त्याठिकाणी शोल्डर लेन चा वापर करावा.
13) महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थाबवू नये.
14) वाहन चालवताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे कारण समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने पाठीमागील वाहनाने समोरील वाहनास धडक दिल्याने घटणाऱ्या अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.
15) ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी म पो केंद्राशी संपर्क साधून तत्काळ भरून घ्यावेत.
16) डायल 112 क्रमांकाची माहिती देण्यात आली
17) मृत्युंजय दुत संकल्पनेची माहिती देण्यात आली.
आनंद थिटे
सहायक पोलीस निरीक्षक
म.पो.उपकेंद्र सांगोला




No comments