राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांचा चोपडी येथे नागरी सत्कार*
*राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांचा चोपडी येथे नागरी सत्कार*
सांगोला प्रतिनिधी
चोपडी तालुका सांगोला येथील रहिवाशी व सध्या पुणे येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव दादासाहेब बाबर यांना राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चोपडी येथे आयोजन केले आहे.
राहुरी विद्यापीठातून एम एस सी ऍग्री केल्यानंतर डिसेंबर 1996 मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाले. त्यानंतर मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे येथे पोलीस दलात काम करताना चोख कर्तव्य बजावले व गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत विभागात सेवा करून अनेक गुन्ह्याची उकल केली त्यामुळे त्यांना आतापर्यंत 351 बक्षीसे, 23 प्रशस्तीपत्रके प्राप्त झाली आहेत. व 2014 मध्ये सेवा कालावधीत गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पदक देऊन ही गौरविण्यात आले आहे व राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने आमचा मान आमचा सन्मान म्हणून त्यांना चोपडी गावातर्फे रविवारी गौरवण्यात येणार आहे

No comments