नाझरे येथील यज्ञ सोहळ्यास तन-मन-धनाने सेवा द्या डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी*
*नाझरे येथील यज्ञ सोहळ्यास तन-मन-धनाने सेवा द्या डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी*
{ नाझरे नगरी यज्ञमय :बाळु महाराज}
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ही संताची भूमी असून संत कवी श्रीधर स्वामी , राजयोगी रंगनाथ स्वामी, वीरभद्र महाराज, संजीव स्वामी महाराज यांच्या भूमीत यज्ञ सोहळा होत आहे म्हणजे सर्व गाव व परिसर पुण्यवान झाला व याचा आनंद सर्वांना मिळणार असे डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांनी नाझरे येथे यज्ञ सोहळ्याच्या कीर्तनरुपी सेवेत सांगितले.
देशाबद्दल सर्वांना अभिमान पाहिजे व स्वच्छतेचा नारा महात्मा गांधींनी दिला परंतु आज त्यांचे नाव घेणारे स्वच्छता करीत नाहीत तसेच देवाने आम्हाला जन्माला का घातले ते यासाठी की मनात अहंकार, मी पण न ठेवता पूजा, दानधर्म, नामस्मरण करा व यज्ञ सोहळ्यासाठी तन-मन धनाने सेवा द्या असेही महास्वामिनी सांगितले.
यज्ञ सोहळ्यात प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक भक्ता मध्ये व स्थानिक रहिवाशांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गाईच्या व शेळीच्या दुधाची खळखळ उकळत्या तुपात दिलेल्या आहुती ने प्रखर तेजस्वी व विजेच्या वेगाने आकाशात झेपावणाऱ्या अग्निज्वाला पाहून भाविक भारावून गेले. यज्ञ सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध भागातील विद्वान पुरोहित हे कार्य तन्मयतेने व विधिवत करीत आहेत व त्यामुळे नाझरे नगरी यज्ञ मय झाली असे बाळू महाराज उर्फ गंगाधर कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी रविशंकर राय पाटणकर महास्वामीजी यांनी कीर्तन रुपी सेवेत रंगत आणली.

No comments