Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

डॉ.भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीस अनेक मान्यवरांची उपस्थिती*

 डॉ.भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीस अनेक मान्यवरांची उपस्थिती*






{अनेक नेत्यांनी डॉ बाबासाहेब देशमुख‌ यांना दिल्या शुभेच्छा*}


सांगोला (प्रतिनिधी): पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे भव्य अशा खुल्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडी सहभागी झालेल्या होत्या.



या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वरा विजय मदने फलटण यांना दोन लाख एक्कावन्न हजार रुपये रोख व आबासाहेब केसरी बहुमान दुसऱ्या क्रमांकास आई तुळजा भवानी प्रसन्न अंकिता राजेश निंबाळकर लोणंद यांना दोन लाख रुपये, तिसऱा क्रमांक पै.सचिन शेठ चव्हाण वाई, एक लाख एक्कावन्न हजार रुपये चौथ्या क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीन शेवाळे हडपसर एक लाख रुपये,पाचवा क्रमांक सेवागीरी प्रसन्न विजय मेडीकल पुसेगाव पंचाहत्तर हजार रुपये ,सहावा क्रमांक भैरवनाथ प्रसन्न बापुसाहेब पांडळे वाघोली पन्नास हजार रुपये,सातवा क्रमांक प्रितेश भैया जुगदर कलेढोण पंचवीस हजार रुपये बक्षीसे विजेत्यांना रोख स्वरूपात मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली.



सध्या आधुनिक युगामध्ये खिलार जनावरांची प्रजाती काहीशी कमी होण्याच्या मार्गावर आहे अशी खिलारे जनावरे सांभाळणे सुध्दा आर्थिक अडचणीचे जरी असले तरी काही बहाद्दर शेतकरी अशी खिलार जनावरे नफा -तोटा न पहाता संगोपन करतात.अशा खिलार‌ जनावरांचे संगोपन करणाऱ्यांना प्रोत्साहीत करण्याच्या हेतुने ही बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी सांगितले. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान व आदरातिथ्य डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी आस्थेने केला.


सदर बैलगाडी शर्यती प्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह (दादा) मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील,माजी.आमदार राजन (मालक) पाटील,आमदार यशवंत माने,मा.पालकमंत्री आमदार दत्तात्रय भरणे (मामा),मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,मा.धैर्यशिल मोहिते पाटील, मा.अभिजीत पाटील,मा.ब्रम्हांनंद पडळकर,मा.प्रणव परीचारक ,प्रकाश चवरे,मा.संजय जी चवरे,मा.आप्पासाहेब देशमुख,मा.सचिन पाटील, मारुती पाटील,मा.सोमनाथ वाघचौरे,किशोर सुळ, रमेश पाटील आसे अनेक नेत्यांनी हजेरी लावली. युवा नेते डॉ अनिकेत देशमुख तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेक जेष्ठ व युवा कार्यकर्ते,नेते विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर शर्यत पाहण्यासाठी आलेला जनसमुदाय डॉ. भाई बाबासाहेब देशमुख‌ तुंम्ह आगे बडो हम तुम्हारे साथ है! आशा घोषणा उस्तफुर्तपणे देताना दिसत होता.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ प्रेमी युवकांनी‌ यशस्वी प्रयत्न केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.



No comments