Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंदिर समितीच्या कारभाराबाबत राज्य सरकार योग्य निर्णय घेईल - चेतनसिंह केदार-सावंत

मंदिर समितीच्या कारभाराबाबत राज्य सरकार योग्य निर्णय घेईल - चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला (तालुका प्रतिनिधी): पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिराच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे श्री विठ्ठल मंदिर समितीबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहेत. मंदिर समितीच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य निर्णय घेतील अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली. 
    पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिराच्या कारभाराबाबत जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. या निवेदनांची दखल घेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मंदिर समितीच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहेत. ना. चंद्रकांत पाटील यांनी प्रभाकर देशमुख यांच्या निवेदनाची दखल घेतली असताना देशमुख यांनी आंदोलन करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी खटाटोप चालला आहे. मंदिर समितीच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभाकर देशमुख यांच्या निवेदनाची ना.चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली असतानाही जाणीवपूर्वक देशमुख यांनी पत्रकार परिषद घेवून आरोप करून प्रसिद्धीचा हव्यास केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
        महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर‌‌‌ संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात 150 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हे काम आता वेगाने आणि वेळेत पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांचा कायापालट होणार आहे. त्यामुळे प्रभाकर देशमुख यांनी आंदोलनांचा मार्ग न स्वीकारता राज्य सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले आहे.

No comments