Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

नाझरे येथे महासोमयाग यज्ञानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 *नाझरे येथे महासोमयाग यज्ञानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन* 



सांगोला प्रतिनिधी

               शिवलीलामृत, हरी विजय, पांडव प्रताप, राम विजय इत्यादी ग्रंथाचे लेखक कवी श्रीधर स्वामी महाराज यांचे नाझरे हे जन्मस्थान तसेच निजानंद रंगनाथ स्वामी व संत कवी श्रीधर स्वामी चुलते पुतणे असलेल्या या नाझरे तालुका सांगोला संताच्या भूमीत आयुष्य काम षड रात्र महासोमयाग यज्ञाचे दिनांक 16 जानेवारी ते 26 जानेवारी अखेर सोमयाजी दीक्षित प.पू.श्री रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराज यांच्या शुभहस्ते आयोजन केले आहे. त्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव, सामूहिक श्री सूक्त हवन चंडीयाग, गणेश याग असे पुण्य पावन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


               आपल्या देशाचा इतिहास यज्ञ प्रधान संस्कृतीने विकसित झाला आहे. समाजात एकात्मता, प्रेम, सद् भावना वाढावी, प्राचीन संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच समाज आणि सृष्टी निरोगी राहावी व आरोग्यवान व्हावी हा संकल्प मनाशी बाळगून आपली यज्ञ संस्कृती हजारो वर्षांपासून विश्वाला मार्गदर्शन करीत आहे व हाच उद्देश ठेवून नाझरे नगरीत एक भव्य दिव्य पवित्र मंगलकारक महासोमयाग होत आहे. मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी यानिमित्त भव्य शोभायात्रा व दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

             बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी रात्रो आठ ते दहा डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांचे कीर्तन तर गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी रात्रो आठ ते दहा महाराज वासकर पंढरपूर यांचे प्रवचन, शुक्रवार 19 जानेवारी रोजी ह भ प व्यास महाराज धाराशिव यांचे कीर्तन, शनिवार 20 जानेवारी रोजी ह भ प डॉक्टर जयवंतराव बोधले महाराज पंढरपूर यांचे कीर्तन, रविवार 21 जानेवारी रोजी हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे कीर्तन, सोमवार 22 जानेवारी रोजी ह भ प आशुतोष कुलकर्णी लोणंद यांचे कीर्तन, मंगळवार 23 जानेवारी रोजी रात्र आठ ते दहा धनगरी ओव्या, बुधवार 24 जानेवारी रोजी हभप गंगाधर कुलकर्णी गंगाखेड यांचे कीर्तन, गुरुवार 25 जानेवारी रोजी ह भ प डॉक्टर ना.पा. देशपांडे नाझरे कर यांचे कीर्तन होणार आहे. तरी किर्तन, प्रवचन व भोजन प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यज्ञ कमिटी, रंगनाथ स्वामी मठातर्फे व नागरिक ग्रामस्थ तर्फे करण्यात आले आहे.






No comments