Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांचा नागरी सत्कार संपन्न.

 वाटंबरे येथे आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांचा नागरी सत्कार संपन्न.


{जल जीवन योजनेच्या कामाचे आ. शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटन}


वाटंबरे / प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे या ठिकाणी शनिवार दि. १३ जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना एक टीएमसी व माण नदीवरील सर्व १६ बंधारे वर्षातून ३ वेळा भरण्यासाठी ०.६०० mcft असे एकूण १.६००  पाणी नव्याने मंजूर केल्याबद्दल वाटंबरे ग्रामस्थ व  लाभार्थी गावांच्या वतीने सांगोला तालुक्याचे आ. शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे  यांचा नागरी सत्काराचे आयोजन केले गेले होते. 


या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी आ. शहाजी बापू पाटील म्हणाले की टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या ८ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान मान्यता मिळाली असून त्यानुसार ५ जानेवारी २०२४ रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना एक टीएमसी तसेच माण नदीवरील सर्व कोल्हापुर पध्दतीचे बंधारे वर्षातून तीन वेळा भरुन घेण्यासाठी ०.६०० एमसी एफटी असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर करण्यात आले आहे .गेली चार वर्षापासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास भरघोस यश आल्याचे सांगताना तालुक्यातील १९ वंचित गांवांसोबत माण नदीवरील २० गावांना याचा मोठा लाभ होणार असून यापुढे माण नदी बारमाही भरलेली असणार, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी या वेळी  सांगितले.

माण नदीवरील सुमारे २० गावांना नव्याने मंजूर झालेल्या ०.६०० एमसीएफटी पाण्याचा मोठा लाभ होणार असून वर्षातून तीन वेळा माण नदीवरील सर्व बंधारे अधिकृतरित्या भरण्यात येणार असल्याने यापुढील काळामध्ये माण नदी बारमाही भरलेली असणार आहे.या योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी या वेळी सांगितले . तसेच या सर्व कामाचे श्रेय त्यांनी आ. दीपक आबा साळुंखे पाटील व सांगोला तालुक्यातील जनतेला दिले जनतेच्या पाठिंब्याशिवाय व आशीर्वादाशिवाय मी कामे  करू शकलो नसतो असे त्यांनी यावेळी भाषणात म्हटले यावेळी त्यांनी गुहाटीला गेल्यावर त्यांना कुणी गद्दार म्हटले कोणी पन्नास खोके म्हटले याचाही त्यांनी यावेळी या आरोपांचा उल्लेख केला, बापू म्हणाले की आमदार होण्याचे माझे स्वप्न नव्हते ती एक चळवळ होती असे त्यांनी म्हटले , सांगोला तालुक्याला विकास कामांना मिळालेल्या निधीचा उल्लेख या वेळी त्यांनी केला जोपर्यंत मी आणि आबा आहे तोपर्यंत सांगोला तालुक्याला विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी आपल्या भाषणात शेवटी ग्वाही दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आताचा जो निर्णय झालेला आहे तो सांगोला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे बापू आमदार झाल्यापासून या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सांगोला तालुक्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे तसेच तालुक्यातील बेरोजगार युवकांना हाताला काम मिळण्यासाठी कोळा, जवळा ,महुद या तिन्ही भागात एमआयडीसी उभा करण्याचे बापूचे आणि माझे प्रयत्न चालू आहेत यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष विजय बाबर, संजय देशमुख, विजय शिंदे ,दादासाहेब लवटे, संभातात्या आलदर यांनी ही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.

यावेळी वाटंबरे गावातील जल जीवन योजनेच्या कामाचे उद्घाटन आ.शहाजी बापू पाटील व आ.दीपक आबा साळुंखे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 आ. शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे  यांच्यावर सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी   वाटंबरे ग्रामस्थच्या वतीने जेसीपी मधून फुलांचा पुष्प वर्षाव करण्यात आला व वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते तानाजी काका पाटील, युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा दादा खटकाळे, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, शहाजी नलवडे,संजय देशमुख, भाजपचे संभातात्या आलदर, सुनील गायकवाड,विजय शिंदे तसेच  मोठ्या प्रमाणात इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या नागरिक सत्कार सोहळ्यासाठी माण नदीवरील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वाटंबरे गावचे सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी , संस्थेचे पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ या नागरी सत्कार सोहळ्यास  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विकास पवार यांनी केले.







No comments